Showing posts with label विहीर. Show all posts
Showing posts with label विहीर. Show all posts

Tuesday, September 11, 2012

श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने अमृतुल्य झालेली श्रींची मूळ विहीर



   श्री क्षेत्र श्री गजानन महाराज विहीर संस्थान, तालुका अकोट जिल्हा अकोला

Shree Gajanan Maharaj Vihir  

श्रींची मूळ विहीर 

जंगलातून जातांना तहानलेल्या श्री गजानन महाराजांनी जेव्हा भास्कर पाटलांना पाण्याची मागणी केली जेव्हा पाटलांनी श्रींना पाणी देण्यास नकार दिला तेव्हा

समर्थ आले विहिरीपाशी ç  तो थेंब नाही तीयेशी çहताश होऊन वृक्षापाशी ç
 बैसले दीनोद्धार जगत्गुरू çç१५çç
समर्थ म्हणती देवदेवा ç हे वामन वासुदेवा ç प्रद्युमंना राघव ç 
हे विठ्ठला नरहरी çç१६çç
देवा हि आकोली ç पाण्यावांचून त्रस्त झाली ç बोलही  राहिला ç 
कोठेंच देवा विहिरीतून  çç१७çç
मानवी यत्न अवघे हरिले ç म्हणुनी तुजला प्रार्थिले çपाव आता जगन्माउले ç 
पाणी दे या विहिरीला çç१८çç 

संदर्भ ... संतकवी श्री. दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथ  अध्याय çççç